पणदूर प्रशालेचे शिक्षक सचिन चोरगे यांचे निधन

Edited by:
Published on: June 28, 2024 04:59 AM
views 239  views

कुडाळ : पणदुर प्रशालेचे शिक्षक सचिन विजय चोरगे (वय. 37) रा. पणदुर यांचे आज पहाटे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. सचिन चोरगे हे गेलं सहा वर्षे पणदुर प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्त एसटी चालक विजय चोरगे यांचे ते थोरले मुलगे होत. त्यांच्या पश्चात आई, काका काकी चुलत बहीण असा मोठा परिवार आहे. सचिन यांच्या जाण्याने पणदुर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. पणदुर येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.