नवसाला पावणारी आई श्री देवी सोमजाई देवस्थानच्या वतीने आजपासून पालखी उत्सव सोहळा

महाड तालुक्यातल्या वाकी बु. इथल्या उत्सवाला मोठ्या संख्येने चाकरमानी उपस्थित
Edited by: महेश कदम
Published on: March 06, 2023 09:57 AM
views 399  views

महाड :  महाड तालुक्यातल्या वाकी बु. इथल्या होळी शिमग्याला अधिक महत्त्व आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या ह्या कोकणात होळी भक्तिभावाने साजरी केली जाते, होळी शिमगा उत्सवात चाकरमानी अगोदर येउन रितसर पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून गाराणे बोलुन नवस करतात, नाच गाणी करतात. 



होळीच्या दुसर्‍या दिवशी आई श्री. सोमजाईची पालखी मिरवणूक गावोगावत फिरवली जाते. आई श्री. सोमजाई ही स्वयंभु व पुरातन जागृत देवस्थान मंदिर आहे. देवीचा महिमा आपल्या सर्व भक्तांना ज्ञात आहे. ह्या मुर्ती पाषाणकाळातील असून ह्यात आई सोमजाई, भैरी, जोगेश्वरी, जननी, पांगारकरीण, काळकाई, नामदाईकरीण अशी ईतिहास काळातील प्राचीन मुर्ती आहेत. 



पालखी मिरवणुक अगोदर साफसफाई, रंगरंगोटी, रांगोळी, लाईटिंग सजावट केली जाते, देवीचे मुखवटे, दागिने व वस्त्रने सजवले जाते, आईच रुप शोभुन दिसते. हा उत्सव हे मंगळवार दि. ०७ मार्चपासून ते बुधवार दि: १५ मार्च पर्यंत संपन्न होणार आहे.  तरी आपण सर्व कुटुंब व मित्र परिवार ह्या सोहळा मध्ये उपस्थित राहावे, अशी सोमजाई देवस्थान मंदिराच्या अध्यक्षानी आवाहन केले आहे.




कार्यक्रमाची रूपरेषा : मंगळवार दि:०७ /०३/२०२३ दुपारी ३ ते ४ वाजता पालखी सजावट (गादीवर) नंतर पालखी सोमजाई मंदिराला भेट व प्रदक्षिणा त्यानंतर शेवते गावाकडे प्रस्थान व रात्री गावठण येथे वस्ती. दि: ०८/०३/२०२३ पासून ते १५/३/२०२३ पर्यंत प्रत्येक गावात पालखी मिरवणूक थाटामाटात केली जाते, त्या मध्ये शेवते, गावठण, नानेमाची आवाड, आंब्याचा माळ, खरकवाडी, संत रोहिदासवाडी,  शेदुरमळई, नारायणवाडी, नांदरुकवाडी, पेडामकरवाडी, शिवाजीनगर येथे प्रस्थान होऊन पालखी मिरवणूक केली जाते. 


प्रत्येक गावात पालखी आल्यावर तिची खणानारळाणे ओठी भरली जाते, पालखीवर शाळ ठेवली जाते, फळ व मिठाई दाखवली जाते, नवस फेडला जातो, दर्शनासाठी चाकरमानी वेगवेगळ्या ठिकाणीतुन येतात, वाजत गाजत पालखी आणली जाते, पालखी नाचवली जाते, फटाके, ढोलताशे वाजवले जातात, येणारे लोकांचा पाऊणचार केला जातो, पालखी मुक्कामाच्या दिवशी भजन, कीर्तन, मग शेवटी देवीची पालखी गादीवर विसर्जन होते. सर्व विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित असतात. 


ह्या उत्सवाला संजय गंगाराम कदम (अध्यक्ष), प्रकाश चंद्रु दरेकर (उपाध्यक्ष), श्रीरंग भागोजी भोसले (सचिव) व विश्वस्त मोहन रामचंद्र म्हामुणकर, प्रदीप रघुनाथ म्हामुणकर, प्रभाकर दिनकर कदम, दिपक यशवंत कदम,  गणपत विठोबा सालेकर, सदाशिव दगडु मोरे, रोहिदास रामा जाधव, बबन शिवराम मोरे, सुरेश मोतीराम म्हामुणकर व गावचे सरपंच द्वारकानाथ जाधव सहित अनेक गावकरी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार असून थाटामाटात पालखी मिरवणूक उत्सव सोहळा भक्तिभावाने दरवर्षी प्रमाणे साजरा केला जाणार आहेत.  तरी आपण सर्वानी दर्शनास यावे, असे आवाहन अध्यक्ष, विश्वस्त व समस्त ग्रामस्थ गावकरी यांनी केले आहे.