
कुडाळ : श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय, माणगावने आयोजित केलेल्या रंगभरण चित्रकला स्पर्धेमध्ये माणगावमधील प्राथमिक शाळांमधून तीन गटातून 69 स्पर्धकांनी सहभाग घेतला. पहिला गट इयत्ता पहिली- दुसरी 2४ विद्यार्थी स्पर्धक सहभागी. दुसरा गट इयत्ता तिसरी- चौथी 24 विद्यार्थी स्पर्धक सहभागी व तिसरा गट इयत्ता पाचवी ते सातवी 21 विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते. वाचनालय अध्यक्ष परशुराम चव्हाण, सहसचिव मेघ:श्याम पावसकर, संचालक शरद (दादा )कोरगावकर व विजय केसरकर आणि वाचनालयाचे सर्व कर्मचारी तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचनालयामार्फत वर्षभरात विविध उपक्रम घेतले जातात. त्यापैकी हा एक. प्रत्येक गटातून गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाना आणि उत्तेजनार्थ एका क्रमांकाला वाचनालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात सर्टिफिकेट आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे. वाचनालयाचे वतीने सहभागी शाळांचे ,गुरुजनांचे, विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे आभार मानून हा कार्यक्रम संपविणेत आला.