
सावंतवाडी : पडवे माजगाव ते पणतुर्ली रस्त्याच्या डांबरीकरण काम ठेकेदार कडे मनुष्य बळ नसल्याने रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण होत नाही, काम पुर्ण होत नाहीत हि आमची मोठी अडचण आहे असे जबाबदार अधिकारी उत्तरे देत आहेत..काम करुन घेण्याची जबाबदारी अधिकारी व लोकप्रतिनिधीची आहे. मात्र, ते पण डोळे झाकून गप्प आहेत.
पडवे माजगाव - कोलझर ते पणतुर्ली या रस्त्यांचे काम ग्रामसडक योजनेतून सुरूवात करण्यात आले आहे. मात्र कामामध्ये कोणतीही सुधारणा नाही, काम धिम्या गतीने सुरू आहे. ते पण निकृष्ट दर्जाचे. काहि ठिकाणी रस्त्याचे खडीकरण करुन माती मारुन ठेवल्याने धुळ लोकांच्या घरात जाऊन लोकांना त्रास होत आहे.आठ दिवसात रस्त्यांचे डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिरिष नाईक यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.
या रस्त्याच्या कामाला १३ मार्चला मंजूर मिळाली आहे, आणि १२ सप्टेंबर २०२५ रोजी मुदत संपत आहे.सातारा येथेली शिवमल्हार ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे.. कामास सुरूवात केली खरी. जबाबदारीने काम ठेकेदार करत नाही असे दिसून येत आहे..तळकट वनबागेकडे मोऱ्यांचे काम केले.कोलझर येथे रस्त्यावर खडिकरण व माती मारुन ठेवली.एक महिना झाला.रसत्यावर पाणी पण मारत नसल्याने माती लोकांच्या घरात जाऊन लोकांना मानसिक त्रास होत आहे.कुंब्रल येथे रस्त्यावर खडी ओतुन ठेवली. आता वाटलं होतं रस्ता डांबरीकरण लवकर होणार मात्र ठेकेदाराने निराशा केली. ठेकेदार काम सोडून पळाला कि गायब झाला हे कळू शकले नाही.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला शोधून रस्त्याचे डांबरीकरण करुन घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. असे शिरिष नाईक यांनी सांगितले.