
दोडामार्ग : पडवे माजगाव - कोलझर ते पंणतुर्ली हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याऐवजी रस्ता चिखलमय केल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
रस्त्यावरुन पायी चालणे पण धोकादायक झाले आहे. रस्त्यांचे तिनतेरा झाले आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणा या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याला जबाबदार अधिकारी आहेत.रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार शिरिष नाईक यांनी केली आहे.
पडवे माजगाव ते कोलझर पंणतुर्ली हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता मंजूर करण्यात आला होता. रस्त्यांच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. मात्र कामाची मुदत संपली आहे.तरी रस्ता डांबरीकरण झाला नाही. कोलझर ते कुंब्रल पर्यंत रस्त्या खडिकरण करण्यात आला. तसेच गटार मारले आहे. मात्र रस्तांचे डांबरीकरण न केल्याने हा रस्ता आता अपघाताग्रस्त झाला. पावसाला सुरुवात झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. खडिवर आली आहे. त्यामुळे वारोवार अपघात होत आहेत.आतापर्यत 20 जण जखमी झाले आहेत.पायी चालतानाही ग्रामस्थ जखमी होत आहे. अशी या रस्त्यांची बीकट अवस्था झाली आहे. या जबाबदार अधिकारी आहेत. कामांचा अनुभव नसतानाही ठेकेदार नेमले असल्याने रस्तांचे काम वेळेत पुर्ण झाले नाही. त्यामुळे अशा बेजबाबदार ठेकेदार वर कारवाई करावी. तसेच रस्ता सुरक्षीत करण्यासाठी उपाययोजना त्वरित करण्यात यावी. वारोवार अपघात होत असल्याने याला जबाबदार अधिकारी आहेत. त्यामुळे जखमींना त्वरीत मदत देण्यात यावी. तसेच येथे कायमस्वरूपी ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार अशा इशारा ग्रामस्थांच्यावतीने शिरिष नाईक यांनी दिला आहे.
तसेत ज्या मोऱ्यांचे व गटाराचे काम केले ते पण निष्कृष्ट दर्जाचे आहे. अधिकारी यांच्या गैर हजेरीत रातोरात काम केले. अधिकारी यांनी ते काम परत करण्यांचे सांगीतले होते असे सांगण्यात येत आहे. मात्र ठेकेदाराने ऐकले नाही. त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिरिष नाईक केली आहे.