
देवगड : प्रसिद्ध लेखिका, इन्फोसिसच्या सर्वेसर्वा पद्मश्री डॉ. सुधामुर्ती या बापर्डे कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर सिंधुदुर्ग देवगड येथे आल्या होत्या. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी कोकणची दक्षिण काशी असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिराला भेट देत यांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष संतोष लब्दे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व कुणकेश्वर मंदिर फोटो प्रतिमा भेट देत तसेच कुणकेश्वर गावच्या वतीने सरपंच गोविंद उर्फ चद्रकांत घाडी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुहास राणे, सुशील राणे, आदी उपस्थित होते