पाडलोसचे ग्रामदैवत रवळनाथ माऊलीचा जत्रोत्सव 18 डिसेंबरला

Edited by: विनायक गावस
Published on: December 13, 2023 15:57 PM
views 84  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव सोमवार 18 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे तसेच ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ सवाद्य पालखी मिरवणूक होणार आहे. नंतर आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.