अतिउत्साही पर्यटकांना पोलीस निरीक्षकांकडून समज | न्हावणकोंडच्या 'राड्या' नंतर पोलीस अॅक्शन मोडवर

'कोकणसाद लाईव्ह'च्या बातमीचा इम्पॅक्ट
Edited by:
Published on: June 30, 2024 07:59 AM
views 317  views

देवगड : कोकणसाद LIVE  ने देवगड तळवडे येथील 'न्हावणकोंड'राड्या ची बातमी प्रसिद्ध केल्या नंतर या बातमीचा परिणाम होऊन देवगड पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. देवगड पोलिस निरिक्षक अरूण देवकर यांनी सहका-यांसमवेत शनिवारी या देवगड तळवडे येथील न्हावण कोंड धबधब्याला भेट देउन पाहणी केली. अनुचित प्रकार केल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशा शब्दात धबधब्याच्या ठिकाणी आलेल्या अति उत्साही युवक युवतींना समज दिली आहे.

गेल्या शनिवारी वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात प्रसिध्द असलेल्या न्हावनकोंड धबधब्यावर युवकांच्या दोन गटात हाणामारी झाली होती.त्या वेळी या युवकांना समजविण्याचा प्रयत्न करूनही ते ऐकले नाहीत व दोन्ही गटात हाणामारी झाली या घटनेनंतर तेथिल ग्रामपंचायत प्रशासन देखील जागे झाले.

त्यानंतर त्या ठिकाणी दोन कर्मचारी ठेवण्याचा निर्णयही झाला.गेल्यावर्षीही तरूणांच्या दोन गटात हाणामारीची घटना घडली होती.यामुळे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनत असून त्याचा वर्षापर्यटनावरही परिणाम होत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच पोलिस प्रशासनही अलर्ट झाले आहे. 

यापुढे असे प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट ताकीद पोलिस निरिक्षक अरूण देवकर यांनी या वेळी येथे मजा करण्यासाठी आलेल्या अतिउत्साही युवकांना दिली आहे. पोलिसांनी शनिवारी या न्हावणकोंड धबधब्याला भेट देवून गोंधळ घालणाऱ्या युवकांना कडक शब्दात समज दिली आहे.