जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा 'Outstanding Technology Implementation in Retail Banking' राष्ट्रीय पुरस्कार

Edited by:
Published on: December 16, 2024 18:56 PM
views 98  views

सिंधुदुर्गनगरी : ICONIC Leadership Award 2024 अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरचा Outstanding Technology Implementation in Retail Banking  साठीचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गोवा येथील आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँकेच्या संगणक विभागाचे सरव्यवस्थापक नितीन सावंत, क्षेत्र वसुली विभागाचे सरव्यवस्थापक दत्ताराम गावडे , व्यवस्थापक संगणक महेश तेरसे व रघुनाथ परब हे उपस्थित होते.