
कणकवली : कोकण भूमी ही रत्नांची खाण आहे. यशस्वी युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे हे आपले कर्तव्य आहे. समाजात वावरताना चांगल्या गोष्टींना न्याय देण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. बांधकाम व्यावसायीक सतीश विजय नाईक यांचे सुपुत्र मेधज नाईक याने सीए इंटरमिडीएट परीक्षेत सुयश मिळवणे ही अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मेधज नाईक यांच्या सत्कार प्रसंगी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी व्यक्त केली.
मेधज नाईक याने सीए इंटरमिडीएट परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. देशपातळीवर सीए इंटरमिडीएट परीक्षेला मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट होतात. चार्टर्ड अकाऊंटंट होण्यासाठी अत्यंत काठिण्य पातळीवरील या परीक्षेतकेवळ ९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यामुळे आपण एका यशस्वी तरुणाचा सत्कार करीत असल्याचे श्री. सर्वगोड यांनी सांगितले. यावेळी उपअभियंता विनायक जोशी, बांधकामचे शैलेश कांबळे, उद्योजक सतीश नाईक उपस्थित होते.