
दोडामार्ग : तिलारी घाटातील रस्त्याच्या बाजूचे सरंक्षक कठडे व दुतर्फा वाढलेली झाडे तसेच आवश्यक त्या उपाययोजना २३ जानेवारी पर्यंत पूर्ण कराव्यात अन्यथा २४ जानेवारी रोजी तिलारी नगर येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सरपंच सेवासंघटनेचे जिल्ह्याध्यक्ष प्रवीण गवस यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांना दिले आहे.
साधारण ७ महिन्यांपूर्वी तिलारी घाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यत जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न म्हणजे एसटी बस वाहतुकही बंद करण्यात आली. तिलारी घाट रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून आवश्यकत्या उपायोजननांची पूर्तता करा अशी वारंवार मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणून बुझून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी प्रवीण गवस यांनी केला आहे. त्यामुळे तिलारी घाटातून एसटी बस सुरु करण्यात संदर्भात दिरंगाई होत आहे.