सह्याद्री इंडस्ट्रीजच्यावतीने ओटवणे शाळेला शैक्षणिक साहित्य

Edited by: विनायक गांवस
Published on: August 17, 2024 13:25 PM
views 57  views

सावंतवाडी : पुणे येथील सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीने ओटवणे - शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक  साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व १०५ विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीने शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.

       

 यावेळी ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडचे एरिया सेल्स मॅनेजर ओंकार पडते, कोलगावच्या रामेश्वर ट्रेडर्सचे मालक सुरेश सुंदेशा,  सावंतवाडीचे प्रशांत ठाकूर, रुपेश परब, ओटवणे माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष सगुण गावकर, पोलीस पाटील शेखर गावकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा गावकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री गावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, रवळनाथ वाचनालयाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, मंगेश भिसे, सदानंद गावकर, पत्रकार लुमा जाधव, महेश चव्हाण, विश्वनाथ बोरये आणि शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री गावडे यांनी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण केल्याबद्दल सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडचे आणि एरिया सेल्स मॅनेजर ओंकार पडते यांचे आभार मानले. तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनीही सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले.