ओसरगाव श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह - वार्षिक जत्रोत्सव !

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 18, 2023 12:13 PM
views 162  views

कणकवली : श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ओसरगाव कानसळीवाडी येथे हरिनाम सप्ताह आणि वार्षिक जत्रोत्सव आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. 

गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताह निमित्ताने सकाळी 8 वाजता पूजा, 9 वाजता घटस्थापना, 10 वाजता ओटी भरणे, 10.30 वाजल्यापासून स्थानिक भजने व सायंकाळी 7 वाजता दिंड्या व चित्ररथ भजनांचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता घट उठवणे तसेच शनिवार 25 नोव्हेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव निमित्ताने सकाळी 8 वाजता पूजा, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, रात्री 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, 9 ते 12 सिंधुदुर्गातील कलाकारांचा नृत्य जल्लोष व त्यानंतर रात्री 12 वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवनकर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रखुमाई मंडळ स्थानिक व मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.