
सिंधुदुर्गनगरी : रानबाबुळी येथे ग्रामपंचायत आणि शुभम परब मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ६७रक्तदात्या नी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुडाळ तालुक्यातील रानबाबुळी येथे शुभम परब मित्र मंडळ आणि ग्रामपंचायत रानबांबुळी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात सरपंच परशुराम परब आणि शुभम परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी जिल्हा रक्तपेढीचे डॉक्टर स्वप्नील चव्हाण सुमंगल लुगडे,भूषण मळेकर मयुरी शिंदे व अन्य डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी कसाल सरपंच राजन परब ग्रा प सदस्य ग्रामस्थ रक्त दाते मोठ्या संख्येने उपस्थित होतेया रक्तदान शिबिराच्या दरम्यान आयुष्यमान कार्ड काढण्यात आले त्याचाही गावातील अनेक ग्रामस्थांनी लाभ घेतला आयुष्यमान भारत केंद्र आणि राज्य शासनाने एक महत्त्वकांक्षी योजना अमलात आणली आहे त्यातून आरोग्य विषयक उपचारासाठी सोयीचे ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले
सरपंच परशुराम परब यांनी आपले विचार व्यक्त करताना रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे अनेक अपघात किंवा अनेक आरोग्य विषयक उपचारासाठी रक्त महत्त्वाचे असते ते प्रत्येकाने दान करणे आज काळाची गरज झाली आहे रानबांबुळी पंचक्रोशीतील तरुणाने आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केलेत्यांना शुभेच्छा देत असेच विविध उपक्रमासाठी सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्याना रक्त पिढीच्या माध्यमातून विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.










