महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचना
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 26, 2025 18:50 PM
views 7  views

सिंधुदुर्गनगरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थ्यांची ग्रामसभेत यादी वाचून संबंधिताना अनुज्ञये कामांबाबत ग्रामसभेत माहिती द्व्यावी, मुदत संपलेली अपूर्ण कामे पूर्ण तात्काळ करावीत, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी कामांच्या नियमित तपासण्या कराव्यात, नियमित आढावा बैठका घ्याव्यात, उद्दिष्टांनुसार मनुष्यदिवस निर्मिती करावी, घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करावीत, कामांच्या संचिका व नोंदवह्या अद्यावत ठेवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या.  

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामकाज आढावा बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन राऊत, जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख तसेच तालुका स्तरावरील सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वनक्षेत्रपाल उपस्थित होते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग व बांबू लागवडमध्ये आत्तापर्यंत 25854 हे. क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. चालू आर्थिक वर्षात 463280 मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे. योजने अंतर्गत एकूण 19.32 कोटी रुपये खर्च झालेला आहे. जिल्ह्याची आधार आधारित प्रदाने ची टक्केवारी 99.72 % पूर्ण झालेली असून Active मजुरांची e-KYC 56.61 टक्के पूर्ण झालेली असून उर्वरित मजुरांची e-KYC तात्काळ पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी  दिल्या. 

आर्थिक वर्ष सन 2025-26 मध्ये झालेली मनुष्यदिवस निर्मिती-* मालवण-46167  (36.60 टक्के), सावंतवाडी-58465  (58.14 टक्के), वैभववाडी-36519  (59.10 टक्के), दोडामार्ग-37199  (69.60 टक्के), कुडाळ-102119  (71.01 टक्के), देवगड-65088 (74.99 टक्के), वेंगुर्ला-38744  (76.28 टक्के), कणकवली-78979  (76.93 टक्के) अशी एकूण 463280  (63.81 टक्के) मनुष्यदिवस निर्मिती झाली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुकानिहाय सुरु असलेल्या घरकुल कामांची संख्या देवगड-197, दोडामार्ग-177, कणकवली-317, कुडाळ-505, मालवण-248, सावंतवाडी-284, वैभववाडी-108, वेंगुर्ला-216 असे एकूण 2 हजार 52 घरकुलांची कामे सुरु आहेत.