
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील घावनळे गावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री देव रामेश्वरचा वार्षिक सात दिवसांचा हरीनाम सप्ताह मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. घावनाळे हे गाव कुडाळ शहरापसुन १० किलोमीटर अंतरावर असून तब्बल १२ वाड्यांच्या अश्याह्या मोठ्या गावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर हे आहे. या स्वयंभू रामेश्वराचा वार्षिक हरीनाम सप्ताह मंगळवार २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. या निमित्त सतही दिवस दिवस रात्र भजने होणार आहेत. त्याचबराबर या साप्ताहच्या चावथ्या दिवसापासून रात्री चित्ररथ दिंड्या निघणार आहेत. या साप्ताहाची संगता मंगळवार दिनांक २ डिसेंबर रोजी होणार आहे.










