
सिंधुदुर्गनगरी : १७ नोव्हेंबर २०२५ रोजी संपलेल्या नामनिर्देशन अर्ज सादरीकरणाच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांसाठी च्या एकूण ७७ सभासद पदासाठी मिळून एकूण ३५९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. आजच्या अखेरच्या दिवशी तब्ब्ल १३५ एवढे अर्ज दाखल झाले आहेत. तर ४ नगराध्यक्ष पदासाठी एकूण ३१ अर्ज दाखल झाले आहेत.यात सोमवारी शेवटच्या दिवशी १४ अर्ज दाखल झाले आहेत. यार्जांची मंगळवारी छाननी होणार असून, २१ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष किती उमेदवार रिंगणात आहेत हे समजणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत यांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर हा कालावधी होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत यासाठी हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सावंतवाडी वेंगुर्ला आणि मालवण या नगरपरिषदांसाठी प्रत्येकी 20 20 सदस्य आहेत तर कणकवली नगरपंचायतीमध्ये 17 सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे.या चारही ठिकाणच्या मिळून एकूण 77 एवढ्या सदस्य पदांसाठी ही निवडणूक होत असून, या 77 सदस्य पदासाठी मिळून एकूण ३५९ तर नागराध्यक्ष पदासाठी ३१ अर्ज दाखल.झाले आहेत. सोमवार १७ नोव्हेंबर पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांच्या सदस्य पदासाठी एकूण ३५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी एका दिवसात १३५ एवढे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर अध्यक्ष पदासाठी आतापर्यंत एकूण ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यातील सोमवारच्या एका दिवशी 14 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
अध्यक्ष पदासाठी सावंतवाडी नगर परिषदेमधून एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर मालवण नगर परिषदेमधून ६, वेंगुरला नगरी परिषद ८ आणि कणकवली नगरपंचायत मधून ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सदस्य पदासाठी सावंतवाडी नगर परिषदेसाठी एकूण ११४ उमेदवारी अर्ज, मालवण नगरपरिषदेमधून ७६, वेंगुर्ला नगरपरिषद ११३, तर कणकवली नगरपंचायतीमधून एकूण ५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
या सर्व अर्जांची छाननी मंगळवार दिनांक 18 रोजी होणार असून,अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर आहे. या अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसानंतरच प्रत्यक्ष रिंगणात किती उमेदवार राहिले आहेत हे निश्चित होणार आहे.










