
सिंधुदुर्गनगरी : १६ नोव्हेंबर २०२५ रोजी संपलेल्या नामनिर्देशन अर्ज सादरीकरणाच्या सातव्या दिवशी जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसाठी सभासद पदासाठी एकूण २२४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. आजच्या दिवशी रविवारी तब्ब्ल १५८ एवढे अर्ज दाखल झाले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण १७ अर्ज दाखल झाले आहेत.यात आज रविवारी १४ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या सोमवारी शेवटचा दिवस आहे यामुळे या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी दिसण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत यांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 12 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर हा कालावधी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचे रविवार १६ नोव्हेंबर पर्यंत सात व्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये शनिवार रविवार हा दिवस सुट्टीचा होता तरीही या दिवशी अर्ज दाखल करून घेतले जातील असे निवडणूक विभागाने जाहीर केल्यानंतर आज रविवारी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत यासाठी हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
सदस्य पदासाठी 224 तर नागराध्यक्ष पदासाठी 17 अर्ज दाखल. रविवार 16 नोव्हेंबर पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांच्या सदस्य पदासाठी एकूण 224 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. रविवारी एका दिवसात तब्बल 158 एवढे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर अध्यक्ष पदासाठी आतापर्यंत एकूण 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यातील रविवारी एका दिवशी 14 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
अध्यक्ष पदासाठी सावंतवाडी नगर परिषदेमधून एकूण 7 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर मालवण नगर परिषदेमधून 3, वेंगुरला नगरी परिषद 5 आणि कणकवली नगरपंचायत मधून 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सदस्य पदासाठी सावंतवाडी नगर परिषदेमधून एकूण 56 उमेदवारी अर्ज, मालवण नगरपरिषदेमधून 63, वेंगुर्ला नगरपरिषद 91, तर कणकवली नगरपंचायतीमधून एकूण 14 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
या नगरपरिषदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सोमवार हा अखेरचा दिवस असून या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे त्यामुळे या चारही नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी एकूण किती उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतात हे सोमवारी सायंकाळी उशिरा समजेल.










