
सिंधुदुर्गनगरी : गावराई जिरेवाडी येथील सुप्रसिद्ध पुरोहित ज्योतिष शास्त्राचे गाढे अभ्यासक प्रकाश माईनकर वय ६५ यांचे पहाटे दुःखद निधन झाले. एक शास्त्रोक्त पुरोहित म्हणून त्यांची ख्याती होती. त्याशिवाय एक उत्तम भजनी बुवा म्हणूनही त्यांचे नाव होते. गेल्या काही महिन्यापूर्वीच त्याला शासनाच्या माध्यमातून भजनी कलाकार म्हणून पेन्शन मंजूर झाली होती.
पहाटे अचानक त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे एका खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. परंतु त्यांची प्राणज्योत माळवली. पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय बहिण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावराई दशक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.










