
सिंधुदुर्गनगरी : खुद्द सरपंचांनाच घंटागाडीचे चालक बनावे लागले. ही स्थिती आहे कुडाळ तालुक्यातील कसाल या गावातील. कसाल ग्रामपंचायतीला इलेक्ट्रिक कचरा उचलण्यासाठीची घंटागाडी मिळालेली आहे. मात्र, यावर चालत नाही. त्यामुळे कसाल बाजारपेठेसह आजूबाजूच्या परिसरातील कचरा उचलण्यासाठी स्वतः सरपंचांनाच या घंटागाडीचे चालक बनावे लागले. कसाल गावचे सरपंच राजन परब यांनी स्वतः या गाडीचे चालकत्व स्वीकारत कसाल आणि परिसरातील कचरा उचलला यामुळे त्यांचे सगळीकडे कौतुक आहे.










