शिवउद्योग संघटना कोकणी महोत्सव २०२५ चं शानदार उद्घाटन !

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 17, 2025 11:07 AM
views 37  views

सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच 'शिवउद्योग संघटना कोकणी महोत्सव २०२५' या भव्य उपक्रमाचे नुकतेच शानदार उद्घाटन कुडाळ येथे करण्यात आले. कोकणातील खाद्यसंस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या महोत्सवामध्ये कोकणात उत्पादित झालेले सर्व प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी स्टॉलवर उपलब्ध आहेत. हा महोत्सव विशेषतः महिला बचत गट आणि विविध गृहउद्योग यांच्यामार्फत बनवलेल्या फराळाचे प्रदर्शन आणि विक्रीचे केंद्र ठरला आहे. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळाले आहे.

शिवसेनेमार्फत (शिंदे गट) सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच असा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. या प्रदर्शनात २३ स्टॉल लावण्यात आले आहे. या यशानंतर यापुढेही असेच नवनवीन उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही यावेळी आयोजकांनी दिली.

नगरसेविका नेरुरकर यांनी यावेळी बोलताना, "स्थानिकांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे. या महोत्सवामुळे बचत गटांना आणि गृहउद्योगांना मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या महोत्सवाला अवश्य भेट द्यावी आणि स्थानिक उद्योजकांना पाठिंबा द्यावा," असे आवाहन केले. अभूतपूर्व प्रतिसादामुळे महोत्सव यशस्वीरित्या सुरू असून, या निमित्ताने सिंधुदुर्गवासीयांना कोकणी पदार्थांची चव चाखण्याची आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

दीपलक्ष्मी पडते महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, विकास गावकर उपजिल्हा प्रमुख शिवसेना, रचना नेरुरकर कुडाळ तालुका प्रमुख शिवसेना, अरविंद करलकर उप जिल्हा प्रमुख शिवसेना कुडाळ, दादा साईल जिल्हा सचिव शिवसेना, विनायक राणे तालुका प्रमुख शिवसेना कुडाळ,दीपक नारकर तालुका प्रमुख शिवसेना कुडाळ, देवेंद्र नाईक उपतालुकाप्रमुख शिवसेना कुडाळ, सागर वालावलकर युवातालुकाप्रमुख शिवसेना कुडाळ, अनिकेत तेंडुलकर युवातालुकाप्रमुख शिवसेना कुडाळ, दिपाली कानसे युवती तालुकाप्रमुख शिवसेना, रेवती राणे तालुका सचिव,श्रुती वर्दम शहर अध्यक्ष कुडाळ,रोहित भोगटे तालुका संघटक कुडाळ, सौरवी चव्हाण विभाग प्रमुख शिवसेना कुडाळ, मधुरा राऊळ उपतालुकाप्रमुख कुडाळ शिवसेना, पूजा तेंडुलकर शिव उद्योग संघटना युवती तालुकाप्रमुख वेंगुर्ला, राजन तोंडवलेकर शिवउद्योग उपतालुकाप्रमुख कुडाळ शिवसेना, सारिका कदम शिव उद्योग संघटना युवती तालुकाप्रमुख कुडाळ, पूजा तोंडवलेकर शिवउद्योग उपतालुकाप्रमुख कुडाळ शिवसेना, राजन भगत, प्रसन्ना गंगावणे,जयदीप तुळसकर, राकेश नेमळेकर, राकेश कांदे,चंदन कांबळी, चेतन पडते, सिद्धेश परब, रंजिता नेरुरकर,

बातमी करा