
सिंधुदुर्गनगरी : दि. १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी भारतरत्न, डॉ.ऐ.जी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त दुपारी ४ ते ५ या कालावधीमध्ये सर्व अध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विदयार्थी यांचे मार्फत पुस्तक प्रदर्शनिचे आयोजन करण्यात आले. सदर पुस्तक प्रदर्शनामध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे अग्निपंख तसेच निसर्ग वर्णन, अध्यात्मीक, धार्मीक, प्रेरणादायक अशा विविध अवांतर विषयांच्या पुस्तकांचा समावेश होता. सदर वाचन प्रेरणा दिवस प्रसंगी महाविदयालयाचे अधिष्ठाता, डॉ. अनंत डवंगे, यांनी पुस्तकांचे महत्त्व अधोरेखीत करतांना पुस्तके हेच आपले जवळचे मित्र आणि गुरु असतात व सर्वांनी वाचनाचा छंद जोपासण्यासंबंधी महत्व पटवून दिले.
या प्रसंगी या महाविद्यालयाचे अधिष्ठाता, डॉ. अनंत डवंगे, वैद्यकीय अधिक्षक, डॉ. शिल्पा नारायणकर, उप-अधिष्ठाता, (पदवीपूर्व) डॉ. श्रेयश बुरुटे, उप-अधिष्ठाता, (पदव्यूत्तर पदवी) डॉ. संतोष फुपरे, डॉ. लतेश रघुते, डॉ. अतुल पाटील, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील अधिकारी, कर्मचारी, एमबीबीएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.