
सिंधुदुर्गनगरी : घावनळे गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सीताराम उर्फ पपू म्हाडेश्वर हे विजयी झाले आहेत. त्यांना १३५ विरुद्ध १३७ मतांनी या पदी विजय मिळवला आहे. घावनळे गावची तहकूब ग्रामसभा गुरुवारी संपन्न झाली. या ग्रामसभेत घावनळे गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार इच्छुक असल्याने हात वर करून मतदान घेण्यात आले. यात पपू महाडेश्वर यांना १३७ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अमोल पालव यांना १३५ मते मिळाली. या निवडणुकीत पपू म्हाडेश्वर हे दोन मतांनी विजयी झाले. पपू म्हाडेश्वर हे गेली कित्येक वर्षे गावातील सामाजिक कामात सक्रिय आहेत. उपसरपंच लक्ष्मण घाडीगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.