
सिंधुदुर्गनगरी : दाखल गुन्ह्याबाबत सदर करण्यात आलेल्या चौकशी अहवाल अहवालावर चार आठवड्यात कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी देऊन त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने सावंतवाडी येथील जयंत बरेगार यांनी आजपासून पुन्हा एकदा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. दरम्यान, पुन्हा एकदा आश्वासन मिळाल्याने बरेगार यांनी उपोषण स्थगित केलं.
माणगांव येथील तत्कालीन वनपाल यांच्या विरोधात जयंत बरेगार यांनी ७ एप्रिल २०२१ रोजी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर तब्बल १३ महिन्याने, १३ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल केला . त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक याचे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले असता त्यांच्या वतीने तीन उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच कुडाळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत चौकशी झालेली आहे मात्र अद्याप कारवाई झालेली नाही तीन वेळा उपोषणे करूनही या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली नाही यामुळे या प्रकरणाचा अर्ज आपल्या कार्यालयाकडे २१ ऑक्टोबर २०२१ पासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. असे जयंत बरेगार यांनी पोलिस अधीक्षक याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .तरी याबाबत न्याय मिळावा व संबंधित दोषींवर कारवाई व्हावी. अशी मागणी करण्यासाठी जयंत बरेगार यांनी ८ जुलैपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. मात्र यावेळी पुढील चार आठवड्यात त्या अहवालावर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी दिले होते. त्यामुळे आपण त्यावेळी उपोषण स्थगित केले होते. मात्र आश्वासनाला दीड महिन्यांचा कालावधीत झाला तरी अहवालानुसार कार्यवाही आणि कारवाई होत नसल्याने सावंतवाडी येथील जयंत बरेगार यांनी आजपासून पुन्हा एकदा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती.