
सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार १२ सप्टेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता ओंम गणेश निवासस्थान, कणकवली येथून ओरोसकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता मा. मुख्यमंत्री यांचा 150 दिवसांचा कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शासकीय विभगांचा आढावा बैठक (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस). दुपारी 12.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय विभागांमध्ये A.I. चा (कृत्रिम बुध्दीमत्ता) प्रभावी वापर करणे संदर्भात आढावा बैठक (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस). दुपारी 1 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा बैठक (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस). दुपारी 1.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिक विम्या संदर्भात आढावा बैठक (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस). दुपारी 3 वाजता जनतेशी संवाद, जनता दरबार (स्थळ:- तहसिल कार्यालय, वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग).