
सिंधुदुर्गनगरी : नुकत्याच मलेशियातील जोहर बाहरू येथे पार पडलेल्या जागतिक अंकगणित व अबॅकस स्पर्धेत एड्यूस्मार्ट इंक. ओरोस केंद्राच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या स्पर्धेत कु. गश्मिर रुक्मिणी कौस्तुभ पारकर, कु. देवेश शुभदा सर्जेराव राणे, कु. सान्वीका कृतिका काशिराम नाईक, कु. अधीश छाया मोहन जंगले, कु. आयांश अद्विका अक्षय कदम तसेच कु. विदित वृषाली चंद्रमणी कदम या विद्यार्थ्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत कु. गश्मिर रुक्मिणी कौस्तुभ पारकर व कु. देवेश शुभदा सर्जेराव राणे यांनी तिसरा क्रमांक पटकावला तर कु. सान्वीका कृतिका काशिराम नाईक, कु. अधीश छाया मोहन जंगले, कु. विदित वृषाली चंद्रमणी कदम व कु. आयांश अद्विका अक्षय कदम यांनी चौथा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवली.
२ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत जगभरातील सुमारे 2000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतातून केवळ 35 विदयार्थ्यांची निवड झाली होती. यशस्वी विदयार्थ्यांनी अबॅकस चे प्रशिक्षण ओरोस येथील एड्यूस्मार्ट इंक. संस्थेमार्फत, संचालिका सौ. आसावरी अजित मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे जागतिक यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, ओरोसचा मान उंचावल्याबद्दल यशवी मुलांचे अभिनंदन करण्यात येत आहे.