
सिधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटनेचे अध्यक्ष पदी आप्पा मांजरेकर तर सचिवपदी सुमीत सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समिती सिंधुदुर्गच्या सिंधुदुर्ग स्टेशनची नूतन कार्यकारणी निवडीची बैठक स्टेशन आवारात पार पडली यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष परशुराम परब, जिल्हा कार्याध्यक्ष शुभम परब, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव अजय मयेकर, जिल्हा सहसचिव साई आंबेरकर, जिल्हा खजिनदार स्वप्निल गावडे,आदींसह जिल्हयाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या निवडीमध्ये उपाध्यक्षपदी पांडुरंग मालवणकर, प्रणाली अवसरे, सुभाष लाड, लता खोत, सहसचिव विशाल मसुरकर, राहुल शिर्के, कार्याध्यक्ष सुनील पाताडे, खजिनदार सुशील निब्रे, सहसचिव सुशील गावडे, प्रसिद्धीप्रमुख मंदार पडवळ, सल्लागार बापू वायंगणकर, उदय दळवी, श्रीकृष्ण भोगवेकर, भाई राणे, सुहास भोजने, सुप्रिया वालावलकर, कार्यकारणी सदस्य दादा गावडे, अरुण घोगळे, नामदेव जाधव, गोपाळ बोभाटे, यशवंत राऊळ, अशोक परब, चंदू सावंत, प्रसाद मुसळे, जयराम सावंत, स्वप्निल वेंगुर्लेकर, सचिन मयेकर आदींची निवड केल्याचे यावेळी जाहीर करण्यात आली.










