
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया उत्पादक संघाची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न फळअन्नप्रक्रिया, तंत्रज्ञान, गुणवता याबाबत मार्गदशन केले. सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया उत्पादक संघातर्फे कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे "फळे व अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी व उपयुक्त रसायने" या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.
या कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथून सुश्री स्नेहा जाधव उपस्थित होत्या. कार्यशाळेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५ फळ प्रक्रिया उद्योजकांनी सक्रिय सहभाग घेतला.प्रशिक्षणामध्ये खालील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. फळे व अन्नप्रक्रियेमधील अभियांत्रिकीची मूलतत्त्वे अभियांत्रिकीतील उपकरणे व तंत्रज्ञानउपयुक्त अन्न रसायने ओळख व सुरक्षित वापर गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया व प्रयोगशाळा चाचण्या दाखविल्या कार्यक्रमाच्या समारोपासाठी श्रीपाद दामले, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, ओरोस आणि श्री पत्की साहेब, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उद्योजकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास व्यक्त केला.सकाळी पासून सुरू झालेली ही कार्यशाळा संध्याकाळी उत्साहात सांगता झाली. उपस्थित उद्योजकांना फळ व अन्न प्रक्रिया क्षेत्रातील अत्यंत उपयुक्त आणि प्रत्यक्ष कामात लागू होणारे ज्ञान मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फळ प्रक्रिया संघाचे अध्यक्ष श्रीधर ओगले, सचिव दीनानाथ गावडे, व खजिनदार हर्षल हिंदळेकर यांचे विशेष परिश्रम लाभले.