
सिंधुदुर्गनगरी : कसाल सरपंच आणि माजी पंचायत समिती सदस्य राजन परब यांचा मुलगा कुमार आनंद राजन परब ( वय - २४ ) याचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. राजन परब हे कसाल गावचे सरपंच आहेत. तसेच ते कसाल सोसायटीचे चेअरमन आहेत.
त्यांच्या मुलाच्या जाण्याने संपूर्ण कसाल क्रोशीवर शोककळा पसरली आहे. आनंद चांगला मृदंग वादक होता. त्याच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी, काका काकी असा मोठा परिवार आहे. कसाल बाजारपेठ तसेच कसाल हायस्कूल बंद ठेवून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. आनंद याच्या अशा अचानक जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.