गंधार भिसे, भुषण साप्ते यांना अनुभूती जनसेवा पुरस्कार जाहीर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 24, 2025 17:11 PM
views 103  views

सिंधुदुर्गनगरी : कसाल गावातील सिध्दिविनायक मित्र मंडळाचे रक्तदाते गंधार चंद्रशेखर भिसे आणी भुषण राजेंद्र साप्ते यांना सन - 2025 या वर्षीचा  बाॅम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर महाराष्ट्र राज्य ओ.एच,एच रेअर ब्लड ग्रुप असोसिएशन ट्रस्ट,तासगाव च्या माध्यमातून देण्यात येणारा राज्यस्तरीय अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्कार सन-२०२५ जाहीर झाला आहे.गंधार भिसे यांनी अनेक वेळा रक्तदान केले असून SDP दाते म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची विषेश ओळख आहे.

त्याच बरोबर भुषण साप्ते यांनी बरेचवेळा रात्रीअपरात्री रक्तदान करून रुग्णसेवेस प्राधान्य दिले आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक, व ईतर राज्यात नावलौकिक केलेल्या सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सचिव किशोर नाचनोलकर यांनी शिफारस केली होती.

या पुरस्काराचे वितरण तासगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत ऑक्टोबर महिन्यात होनार आहे.रक्तदान क्षेत्रात निस्वार्थ पणे काम करणाऱ्या या दोघांचेही सर्वांकडून कौतुक होत आहे.