
सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार १०० शाळांना भेटी देणे हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये नियोजनपूर्वक राबविला जात आहे. जिल्हयातील सर्व शाळा दि.१६ जून २०२५ पासून सुरु होत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्हयातील वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांनी दि.१६ व १७ जून २०२५ रोजी प्रत्येकी एका शाळेला भेट दयावी असे शासनाचे निर्देश असून या दोन दिवसांत जिल्ह्यातही सर्व लोकप्रतिनिधी व विभागातील सरकारी यंत्रणेचे वर्ग १ व २ चे अधिकारी शाळांना भेट देतील अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली .
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे, समाज, पालक यांचा शिक्षणाचा दृष्टीकोन सकारात्मक करणे, बालकांनी आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे, तसेच सर्व विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलव्ध करून देणे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत दाखल होणाऱ्या विदयार्थ्यांचे स्वागत करावे, शासनातर्फे देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, मोफत बुट व पायमोजे वितरीत करावेत, शाळांमधील कामकाजाचा, शैक्षणिक गुणवत्तेचा व इतर सोयीसुविधांचा आढावा घ्यावा व मार्गदर्शन करावे, विदयार्थ्यांच्या अध्ययनाचे मुल्यमापन करावे अशा प्रकारचे निर्देश आहेत. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी शाळाव्यवस्थापन समिती सदस्य व सरपंच यांचेशी चर्चा करुन ग्रामीण भागातील विदयाथ्यांचा जिल्हा परिषद शाळेकडे कल वाढविण्यासाठी उपायोजना सुचवाव्यात अशी अपेक्षा आहे.
शाळेतील भौतिक सुविधेचा दर्जा, विद्याथ्यांच्या कला व क्रीडा सुविधेचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा तसेच विद्यार्थ्याच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार या सारख्या विविध विषयावात मार्गदर्शन करावे तसेच शाळेची धोकादायक बांधकामे, यापराअभावी / पाण्याअभावी बंद असलेली शौचालये या सारख्या मूलभूत समस्या आढळून आल्यास संबंधित यंत्रणेस ठोस सूचना कराव्यात या उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या एकूण १३४४ शाळा आहेत. पहिल्या दिवशी दिनांक १६/०६/२०२५ लोकप्रतिनिधी व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी व शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, जिल्हा समन्वयक, विषयतज्ज्ञ व विशेषतज्ज्ञ व विशेष शिक्षक असे सर्व २४२ शाळांना भेटी देणार आहेत. दुसऱ्या दिवशी दिनांक १७/०६/२०२५ रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी व शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, जिल्हा समन्वयक, विषयतज्दा व विशेषतज्ज्ञ व विशेष शिक्षक असे सर्व २३६ शाळांना भेटी देणार आहेत.
या दोनही दियशी त्यांच्या हस्ते शाळेत दाखल होणान्या विदयार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक व गणवेश वितरण होणार आहे. तसेच पहिले पाऊल या उपक्रमात सहभागी होऊन विदयार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. अश्याप्रकारे दिनांक १६/०६/२०२५ व दिनांक १७/०६/२०२५ या दोन दिवसात सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी व शिक्षण विभागातील कर्मचारी एकूण ४७८ शाळांना भेटी देणार आहेत. या दोन दिवसांसाठी दिलेल्या दोन शाळा त्यांना वर्षभरासाठी दत्तक देण्यात आलेल्या आहेत. वर्षभरात सदर अधिकारी यांनी दत्तक शाळांना वेळोवेळी भेटी देऊन शाळा विकासासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी दिनांक १६/०६/२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी प्रत्येकी १ शाळेस भेटी देणार आहेत. सर्व पालकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व दर्जेदार शिक्षणासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत निश्चित करावा.