
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ या निमित्ताने रक्तदान शिबिर व रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या निमित्ताने सहकारातील विविध संस्था वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असून यामध्ये प्राथमिक शिक्षक पतपेढी या संस्थेने जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी कक्षात तेरा रक्तदात्यांसहित रक्तदान केले. तसेच जिल्हा रुग्णालयातील सुमारे दीडशे रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम संपन्न केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्ष ऋतुजा जंगले,संचालक सर्वश्री संतोष मोरे,नारायण नाईक,संतोष राणे,श्रीकृष्ण कांबळी,मंगेश कांबळी,सीताराम लांबर,सचिन बेर्डे,महेंद्र पावसकर, समीक्षा परब,तज्ज्ञ संचालक किशोर कदम,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराधा माईणकर,अकौंटट मनोज सावळ, संगणक तज्ज्ञ समीर नातू,संघटना नेते भाई चव्हाण, तुषार आरोसकर, नंदकुमार राणे, नामदेव जांभवडेकर, नंदकिशोर गोसावी, राजेंद्रप्रसाद गाड, संदीप गोसावी, अमित पवार, विकास घाडीगावकर, संस्थेचे सर्व शाखाधिकारी सर्वश्री सुशांत तळेकर, संदीप जांभळे, अनघा गोसावी, चेतन बिडये, सुरेखा खाकर, प्रियांका तावडे, स्वाती परमेकर, पूजाराणी गावडे तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.