निरवडेत साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन...!

Edited by: विनायक गावस
Published on: March 26, 2024 05:50 AM
views 84  views

सावंतवाडी : निरवडे साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळाच्या वतीने बुधवार २७ ते २९ मार्चपर्यत साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार २७ रोजी सकाळी ८ वाजता मूर्तीपूजन व पादुका पूजन,दुपारी ११ वाजता आरती,दुपारी १२.३० वाजता तीर्थप्रसाद,दुपारी १.३० वाजता महाप्रसाद,सायंकाळी ५ वाजता हरिपाठ व आरती ( महिला मंडळ निरवडे झरबाजार ),सायंकाळी ६ वाजता संगीत रजनी ( प्रायोजक प्रभावती कॅाम्प्युटर संदिप दळवी ) बुवा डॅा. श्रीराम दिक्षीत ( हार्मोनियम गजानन मेस्री,तबला अक्षय सरवणकर,पखवाज मेहल कांडरकर ) रात्री ७.३० वाजता साटम महाराज कला क्रिडा मंडळाचे भजन व आरती 

गुरुवार २८ रोजी सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती,सायंकाळी ७ ते ८.३० ह.भ.प.सौ.ललीन प्रभाकर तेली यांचे किर्तन,सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत भजनांचा कार्यक्रम व आरती शुक्रवार २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता हरिपाठ व आरती, रात्री ८ वाजता लिलाव,रात्री ९ वाजता संयुक्त दशावतार नाट्यमंडळ, यांचा “ प्रतिकृष्ण “ हा नाट्यप्रयोग होणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळ निरवडे यांनी केले आहे.