संयुक्त जयंती मोहत्सवाचे आयोजन..!

Edited by:
Published on: May 19, 2024 13:59 PM
views 186  views

कणकवली : फ़ोडाघाट बौध्द विकास मंडळ, मुंबई व गावशाखा तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फ़ोडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने फ़ोडाघाट येथील नालंदा बुद्ध विहारात दि.22व 23मे 2024रोजी भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुकत जयंती मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 22 मे रोजी सकाळी 10.00. ते 11.30 वाजता कणकवली येथील प्रसिद्ध स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. शामिता बिरमोळे (एम. डि.)यांचे स्रियांचे आजार व त्याबाबत घ्यावयाची काळ्जी यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.11.30ते 13.00या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून फ़ोडाघाट प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव (एम. बि. बि. एस.)व त्यांचे सहकारी रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करणार आहेत. संध्याकाळी 18.00ते 20.30या कालावधीत स्रियांचे व मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.23मे रोजी सकाळी 9.00ते 9.30ध्वजारोहण,9.30ते 10.30 धम्मपूजापाठ,10.30ते 12.00या कालावधीत पत्रकार, साहित्यिक अजय कांडर व कवयित्री प्रा. प्रमिता तांबे, कणकवली यांचे भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रात्री 9.30नंतर संस्कृतीक कार्यक्रम, मान्यवरांचे मार्गदर्शक व बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला आहे. तरी वरील दोन दिवसीय कार्यक्रमांस आंबेडकर वैचारिक प्रेमीनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे