देवगडमध्ये उद्या 'स्वरदीपोत्सव'चं आयोजन..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 10, 2023 19:59 PM
views 102  views

देवगड : उद्या सायंकाळी ६ वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे दिपावलीच्या पूर्व संध्येला स्वरऋतू निर्मित “स्वरदीपोत्सव” हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमात मुंबई येथील सुप्रसिद्ध गायिका संपदा माने व रत्नागिरी येथील गायक अभिजीत भट यांचे सुरेल गायन ऐकायला मिळणार आहे.

वादक कलाकारांमध्ये संवादिनी चैतन्य पटवर्धन, पटवर्धन, ऑर्गन-वरद सोहनी, तबला अभिनव जोशी व सौरभ वेलणकर, कीबोर्ड- हर्षद जोशी, तालवाद्य- हर्ष बोंडाळे, ध्वनी संयोजन उदयराज सावंत (रत्नागिरी), निवेदिका म्हणून सौ. पूर्वा पेठे या काम पाहणार आहेत. स्वरऋतूच्या या कार्यक्रमाचा देवगड तालुक्यातील रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वरऋतूचे हर्षद जोशी यांनी केले आहे.