नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवेमध्ये टाऊन हॉल मिटिंगचे आयोजन

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 08, 2023 11:54 AM
views 175  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे मध्ये टाऊन हॉल मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या मिटिंगमध्ये दुपारच्या सत्रात शिक्षकेतर कर्मचारी व इतर स्कूलबस चालक कर्मचारी यांच्यासाठी आपल्या सहकार्याबद्दलचे मत मांडण्या विषयीचा उपक्रम घेण्यात आला. तसेच प्रश्नमंजुषा घेण्यात आली होती.

दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व दिवाळी भेट देण्यात आली. यानंतर  संध्याकाळच्या सत्रात शिक्षक व कार्यालयीन काम करणारे कर्मचारी यांच्यासाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकार्ह्या विषयी असणारे मत व्यक्त केले. प्रश्नमंजुषा तसेच ओळखा पाहू हे उपक्रम घेण्यात आले.तसेच यामध्ये शाळेसाठी विशेष योगदान देणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. याबरोबरच दिवाळी भेट व दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या मिटिंगचे आयोजन शाळेच्या सीईओ शुक्ला मॅडम यांनी केले होते. या मिटींगला शाळेचे अध्यक्ष मनोज गुळेकर, सेक्रेटरी मोहन कावळे तसेच राजेंद्र ब्रह्मदंडे उपस्थित होते.