
दोडामार्ग : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून आयोजित "हर घर तिरंगा" अभियान सूर करण्यात आलंय. या अंतर्गत आपल्या घरी राष्ट्रध्वज फडकावून लोकांच्या हृदयात देशभक्ती भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबदल जागरूकता वाढविणे, या उपक्रमाला कसई दोडामार्ग नगरपंचायतनेही प्रतिसाद दिला आहे. गेल्या दोन वर्षात "हर घर तिरंगा" हे अभियान लोक चळवळ बनल असून सदर अभियान राज्यात व देशात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजर केल जात आहे.
याचाच एक भाग म्हणून १३ ऑगस्ट रोजी कसई-दोडामार्ग नगरपंचायत मार्फत "हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत पिंपळेश्वर हॉल ते नगरपंचायत कार्यालय "मशाल रॅली" चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे नेतृत्व नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केलं. यामध्ये दोडामार्ग इंग्लिश हायस्कूल दोडामार्ग व लक्ष्मी सीताराम हळबे महाविद्यालयाचे विद्यार्थी, NCC विद्यार्थी सहभागी झाले होते. "हर घर तिरंगा" मोहीमेची शपथ घेऊन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून रॅलीची सुरवात करण्यात आली.
नगरपंचायत कार्यालय येथे तिरंगा ध्वज फडकावून रलीची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी पोलीस स्टेशन दोडामार्गचे PSI आनंद नाईक, पोलीस समीर सुतार, इंग्लिश हायस्कूल दोडामार्गचे मुख्याध्यापक प्रल्हाद महादेव सावंत, शिक्षक रमाकांत जाधव, लक्ष्मी सीताराम हळबे महाविद्यालयाचे शिक्षक डॉ. प्रशांत ढेपे, जेष्ठ नागरिक संघटना अधक्ष्य दिनकर उगवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दोडामार्ग इंग्लिश हायस्कूल दोडामार्गचे NCC थर्ड ऑफिसर आनंदा बाम्हणीकर यांनी केले. यावेळी कसई-दोडामार्ग नगरपंचायतचे वसीम खाटीक (प्रशासकीय अधिकारी), अभिषेक नेमाणे (स्थापत्य अभियंता), संजय शिरोकर (लिपिक), सुभाष केतकर (पंप ऑपरेटर), श्रीम. सुरेखा ताटे (लिपिक), श्रीम. वर्षा गवस (लिपिक), प्रबोधन मठकर (स्थापत्य अभियंता) तसेच नगरपंचायत कर्मचारी सिद्धेश शेगले, सूर्यनारायण गवस, श्री. प्रमोद कोळेकर, श्रीम. प्रणाली शेटकर, स्वप्नील सावंत आदी कर्मचारी उपस्थित होते.