नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तायक्वांदो बेल्ट प्रमोशन टेस्टचं आयोजन...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 18, 2024 07:52 AM
views 156  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे व तायक्वांडो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने तायक्वांदो बेल्ट प्रमोशन टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परीक्षक म्हणून तायक्वांडो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग सचिव तथा राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक भालचंद्र कुलकर्णी, एकनाथ धनवटे,अविराज खांडेकर, भाग्यश्री जाधव, लाजरी वातकर यांनी काम केले.

या परीक्षेत नॅशनल इंग्लिश स्कूल च्या 34 विद्यार्थ्यांना येलो बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्रशाळेच्या मुख्याध्यापिका निलम डांगे, पर्यवेक्षक कौस्तुभ देसाई,  तेजश्री भोकरे, क्रीडा विभाग प्रमुख अमोल चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यपिका निलम डांगे व कौस्तुभ देसाई यांनी मुलांना मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या येलो बेल्ट परीक्षेत खालील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. *मुली*- आमना गिरकर, तामिम पावसकर, श्रुती कावळे, निधी कोवळे, भूमी पिसे, अफराह काझी, अनुष्का अबुज, सोहा चौगुले, कांचन अडुळकर, जिया तळगावकर, देविका माळकर, जान्हवी राणे, आराध्य सावंत, अमिरा पावसकर, रिदाफातिमा पटेल, आराध्या पाटणकर, स्वरा कुबल, शुभ्रा चिके 

विद्यार्थी अथर्व कुबल, साईश कुबल, जईद काझी, साई गुरव, तन्मय मुद्रस, हर्षण अडुळकर, वेद कदम, अदनान काझी, इसा मुकादम, अफान काझी, अर्णव राणे, रुद्र राणे, हिमांशू धुरत, साहिल अडुळकर, भार्गव गुळेकर, जय राणे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तायक्वांडो पंच व प्रशिक्षक एकनाथ धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे, चे अध्यक्ष मनोज गुळेकर,सेक्रेटरी मोहन कावळे खजिनदार परवेझ पटेल,सह सेक्रेटरी राजेंद्र ब्रम्हदंडे,सीईओ नीता शुक्ला  यांनी अभिनंदन केले.