
कुडाळ : सरत्या वर्षाला निरोप देण्याकरिता आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता रोटरी क्लब ऑफ कुडाळ मार्फत २९, ३० आणि ३१ डिसेंबर रोजी यावर्षी रोटरी महोत्सव २०२३ कुडाळ हायस्कूलच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष रो. दिनेश आजगावकर यांनी दिली. यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष दिनेश आजगावकर, रो. प्रणय तेली, रो. शिल्पा बिले, रो. सई तेली, रो राजन बोभाटे आदी उपस्थित होते.
या महोत्सवाच्या निमित्ताने सर्व उद्योजकांना आपल्या उत्पादनाची जाहिरात व विक्री करण्यासाठी उत्कृष्ट संधी निर्माण झाली आहे तसेच उद्योजकांना आपल्या मालाची हजारों ग्राहकांसमोर प्रत्यक्ष मांडणी करून विक्री करण्यासाठी स्टॉल्स पण उपलब्ध केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकपरंपरा व सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी उत्कृष्ट रंगमंच व्यवस्था, आकर्षक रोषणाई देखील नेहमीप्रमाणे असणार आहे ऑटो एक्सपो म्हणजेच नामांकित कंपन्यांच्या कार व टू व्हीलर एकत्रित पाहू आणि खरेदी करण्याची सुद्धा लोकांना सुवर्णसंधी आम्ही या निमित्ताने उपलब्ध करून देत आहोत. या महोत्सवामध्ये विविध मालवणी चायनीज कोल्हापुरी पंजाबी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील उपलब्ध राहणार आहे. २९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता इनरव्हील क्लब कुडाळच्या वतीने पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे पाककला स्पर्धेत सहभागी होण्याकरता सौ चित्रा बोभाटे व शिल्पा बिले यांच्याशी संपर्क साधावा. सात वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल त्यानंतर महिला भगिनींकरिता खेळ पैठणीचा कार्यक्रम आणि Innerwheel Queeen आणि Rotary princes ही सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा अर्थात फॅशन शो होणार आहे. याकरिता नाव नोंदणी साठी सई तेली आणि डॉ. जयश्री केसरे यांना संपर्क करायचा आहे.
त्याचप्रमाणे ३० डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि त्यानंतर रायझिंग स्टार ही गीता गायन स्पर्धा आयोजित केली आहे स्थानिक कलाकारांचा नृत्याविष्कार देखील आयोजित केलेला आहे या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरिता अभिषेक माने आणि श्वेता नाईक यांना संपर्क करायचा आहे. ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हिंदी व मराठी बहारदार गाण्यांचा कार्यक्रम आणि नृत्याविष्कार जल्लोष हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार देखील सामील होणार आहेत नवीन वर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी देखील करण्यात येणार आहे. इंटरॅक्ट क्लब तर्फे फनिगेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. स्टॉल बुकिंग करिता राजन बोभाटे, गजानन कांदळगावकर, एकनाथ पिंगुळकर यांना संपर्क साधायचा आहे. या कार्यक्रमाला आकर्षक रंगमंच उत्कृष्ट साऊंड सिस्टिम आणि लाईट सिस्टिम चे नियोजन करण्यात येणार आहे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अधिक माहिती करता मयूर शिरसाट यांना संपर्क करायचा आहे सर्व नागरिकांसाठी या महोत्सवामध्ये लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आलेले आहे. असे रोटरी फेस्टिवल 2023 चे इव्हेंट चेअरमन प्रणय तेली यांनी सांगितले.