SPK त 'कलादर्पण' चं आयोजन

Edited by:
Published on: January 27, 2025 14:28 PM
views 126  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे पारंपारीक दिन 'कलादर्पण' चे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक दिनाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसंचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य डॉ. सतीश सावंत, जयप्रकाश सावंत ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये  महाविद्यालयाचे आय क्यू ए.सी समन्वयक डॉ. बी एन हिरामणी, प्रा. एम ए ठाकूर सांस्कृतिक समिती समन्वयक डॉ. डी.जी बोर्डे, डॉ. एस एम बुवा, प्रा. राठोड तसेच महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पारंपारिक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी ग्रुप डान्स, सोलो डान्स, गायन, नाट्य , कोळीनृत्य, पारपारिक नृत्य या कला प्रकारामध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमांमध्ये विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे समर्थ संतोष गवंडी या विद्यार्थ्याने कांतारा या चित्रपटातील वेशभूषा करून नृत्य सादर केले त्याला विद्यार्थ्यांचा खूप प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या उत्तम प्रतिसादामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तप्रसाद मुळीक यानी केले.