२० नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

Edited by: रुपेश पाटील
Published on: November 19, 2022 17:56 PM
views 259  views

  सामाजिक कार्यकर्ते आदित्य हळदणकर यांचे चिरंजीव कु.समर्थच्या ५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,शाखा- वेंगुर्ला व हॉस्पिटल नाका मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्या संयुक्तविद्यमाने रविवार दि.२० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० ते  दुपारी १.०० पर्यंत बी.के.खर्डेकर महाविद्यालय,वेंगुर्ला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे आदित्य हळदणकर आणि मित्रपरिवाराच्या वतीने हे ५ वे रक्तदान शिबीर आहे.

     तरी या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी,रक्तदान चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सर्वांनी सहभागी होणे प्रार्थनिय आहे.इच्छुक रक्तदात्यांनी आदित्य हळदणकर (9209203962),संजय पिळणकर,विभागीय अध्यक्ष (9403298227), ॲलिस्टर ब्रिटो,वेंगुर्ला तालुका अध्यक्ष (9673462278) महेश राऊळ (9405933912) यांच्याशी संपर्क साधावा.