रानभाजी स्पर्धेचं आयोजन..!

Edited by: विनायक गांवस
Published on: August 08, 2024 13:03 PM
views 171  views

सावंतवाडी : सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सून महोत्सव निमित्ताने रविवारी 11 ऑगस्टला सायंकाळी चार वाजता काझी शहाबुद्दीन हॉल या ठिकाणी रानभाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी कोकणातील पावसाळी रानभाज्य तयार करून या ठिकाणी आणायच्या आहेत.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 5000, द्वितीय पारितोषिक 3000, तृतीय पारितोषिक 2000 व उत्तेजनार्थ 1000 असे पारितोषिक ठेवण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेत कोकणातील पावसाळी ऋतूत जंगलात आढळणाऱ्या विविध वनस्पती तसेच आधीपासून भाज्या बनवल्या जातात तसेण विविध पदार्थ बनवले जातात. या पदार्थांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे‌. ही स्पर्धा गेली पाच वर्ष आयोजित करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा तसेच खवय्यांनीही या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, कार्यप्रमुख अँड. संतोष सावंत, अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी केले आहे.