राऊळ महाराज संस्थानात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Edited by:
Published on: January 21, 2024 06:49 AM
views 83  views

कुडाळ : अयोध्या येथे श्री राम मंदीरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असून सर्व हिंदूंचे श्री राम मंदीर होणे हे ५०० वर्षा पासूनचे स्वप्न साकार होत आहे. या दिवसाचे औचित्य साधून पिंगुळी प.पू संत राऊळ महाराज संस्थानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एका दैवी सोहळ्याचे साक्षीदार होणार आहोत त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानचे कार्याध्यक्ष श्री विठोबाजी राऊळ यांनी केले आहे.

सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी प.पू.सद्गुरू राऊळ महाराज संस्थान , पिंगुळी येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत अखंड ९ तास " श्रीराम जय राम जय जय राम " हे नामस्मरण होणार आहे. दुपारी महाप्रसाद व्यवस्था कऱण्यात आली आहे.संध्याकाळी ६ :३० वाजता दीपोत्सव व संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत आरती व द्वादशी पालखी सोहळा संपन्न होणार आहे. व रात्री ही महाप्रसाद असणार आहे. तरी सर्वांनी सहकुटुंब उपस्थित रहावे , या दिवशी अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत . तरी याठिकाणी रात्री ९ वाजेपर्यंत कार्यक्रम असल्याने आपल्या जवळच्या स्थानावरील कार्यक्रम आटोपून या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आग्रहाचे आवाहन संस्थानचे कार्याध्यक्ष श्री विठोबाजी राऊळ यांनी केले आहे .