तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षणाचं आयोजन...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 09, 2024 13:09 PM
views 49  views

देवगड : शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कडून करण्यात येणारी कार्यवाहि अधिक परिणामकारक निर्दोष व नियोजनबद्ध व्हावी व जनतेला शुद्ध सुरक्षित पाणी पुरवठा व्हावा यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी केले.

जल जिवन मिशन अंतर्गत तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण पंचायत समिती कणकवली सभागृहात गटविकास अधिकारी कणकवली अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ . पुजा काळगे, कक्ष अधिकारी अनिल चव्हाण , वैदयकिय अधिकारी डॉ . मोरेश्वर ढोके, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत सुर्यकांत वारंग, विस्तार अधिकारी ग्रा.प . रामचंद्र शिंदे , अधिक्षक मनिषा देसाई , आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल ठाकुर ,पाणी गुणवत्ता सल्लागार नागेश तोरस्कर , अणुजैविक तज्ञ कणकवली लॅब रसिका पिळणकर , गटसमन्वयक नम्रता हरकुळकर , उपविभागीय तज्ञ निरज तांबे आदी मान्यवर उपस्थित होते .

पाणी गुणवत्ता सल्लागार नागेश तोरस्कर यांनी पिण्याचे पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण लाल कार्ड , पिवळे कार्ड , हिरवे कार्ड, चंदेरी कार्ड  तसेच पाणी गुणवत्ता विषयक शासन निर्णय याबाबत मार्गदर्शक तर अणुजैविक तज्ञ रसिका पिळवणकर यांनी पाणी नमुने तपासणीचे माणके , रासायनिक व जैविक पाणी नमुने तपासणी मोहीम  याबाबत मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक , आरोग्य सहाय्यक , आरोग्य सेवक उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे प्रस्ताविक  विस्तार अधिकार सुर्यकांत वारंग तर आभार गटसमन्वयक नम्रता हरकुळकर यांनी मानले.