खुल्या तालुकास्तरीय वाचक स्पर्धचं आयोजन

Edited by:
Published on: January 08, 2024 14:19 PM
views 76  views

सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी तर्फे खुली तालुकास्तरीय वाचक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन या संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या कोणत्याही प्रकारच्या साहित्य कृतीवर विवेचन करणे आवश्यक आहे.

स्पर्धेचे नियम व अटी यात वय वर्षे १६ व त्यावरील कोणत्याही स्पर्धकाला स्पर्धेत भाग घेता येईल, दिलेल्या विषयाचे रसग्रहण विवेच (वक्तृत्व) अपेक्षित आहे. वेळ मर्यादा ७ मिनिटे असुन  प्रथम तीन क्रमांकाना रोख रकमेचे पारितोषिक प्रथम क्रमांक रु. ५००/-, द्वितीय क्रमांक रु. ३००/-, तृतीय क्रमांक रु. २००/- आणि प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपली नावे १६ जानेवारी २०२४ पर्यंत ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत ग्रंथालयात द्यावीत असं आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७३८५९७५२०९ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे २१ जानेवारी २०२४ रोजी होणा-या जिल्हास्त्रीय वाचक स्पर्धेत भाग घ्यायला मिळणार असून सावंतवाडी तालुक्यातील अधिकाधिक वाचकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.