SPK त IT च्या विद्यार्थ्यांसाठी इंटरशीप प्रोग्रामचे आयोजन ; 40 विद्यार्थ्यांचा सहभाग

Edited by: विनायक गावस
Published on: July 01, 2023 13:04 PM
views 180  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दिनांक 10 जून ते 24 जून 2023 पर्यंत  15 दिवसाच्या इंटरशीप प्रोग्रॅमचे आयोजन  सॉफ्टमस्क प्रायव्हेट लिमिटेड ,बेळगाव या कंपनीच्या वतीने केले होते.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त  युवराज लखमसावंत भोंसले .युवराज्ञी सौ.श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई,सहसंचालक अॅड. शामराव सावंत,सदस्य डॉ. सतीश सावंत, श्री जयप्रकाश सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांच्या मार्गदर्शनाने या इंटरशीप प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील 40 विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला.   

          65 तासांच्या इंटरशिप प्रोग्राम मध्ये  भाग घेतलेल्या मुलांमधून उत्कृष्ट सहभागाबद्दल बेस्ट परफॉर्मन्ससाठी मुलींमधून  सायली कुडतरकर व मुलांमधून ओमकार राणे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर ,सॉफ्टमस्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने राजशेखर पाटील , त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. सौ अक्षता गोडकर ,संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा.सौ विभा गवंडे संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील प्रा.सौ स्नेहल नाईक , प्रा. आदित्य वर्दम ,प्रा.प्रणाम कांबळी, सिद्धीविनायक सावंत, विद्यार्थी उपस्थित होते. 

         सॉफ्टमस्क प्रा.लिमीटेड व श्री पंचम खेमराज महाविद्यालययामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.या इंटरशीप प्रोग्राम मध्ये पायथॉन टुलस्टॉक डेव्हलपमेंट मध्ये काम करण्यात आले.