
सावंतवाडी : आपण वर्षानुवर्षे आपले सण साजरे करत आले आहोत. गणेशोत्सव साजरा करताना यापूर्वी आपण विविध झाडांची पाने, वस्त्रे, कापूस, कापड इत्यादि नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून आपल्या बाप्पाची आरास सजवायचो मात्र गेल्या काही वर्षात आपल्याकडे आपले लाडके बाप्पा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या स्वरुपात आणि प्लॅस्टिकच्या सजावटीच्या गराड्यात दिसतात, प्लॅस्टिकचा व थरमोकॉलचा वापर कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच निसर्गापासून घेतलेल्या वस्तु, निसर्गाला हानी होणार नाही, अशा स्वरूपात पुनः निसर्गाला समर्पित करणे असा या स्पर्धेमागचा हेतु आहे. यासाठी सावंतवाडी नगरपरिषद कडून सावंतवाडीचो लाडका इकोफ्रेन्डली बाप्पा स्पर्धा 2024 याअंतर्गत नागरिकांसाठी रील स्पर्धा व इकोफ्रेन्डली बाप्पा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे अटी व शर्ती नियम नगरपालिका आरोग्य विभागात मिळतील तसेच या स्पर्धेसाठी नावनोंदणी नगरपरिषद कार्यालय आरोग्य विभाग येथे दि.9 ते 20 सप्टेंबर रोजी पर्यंत करावयाची आहे. यासाठी प्रथम क्रमांक रक्कम रुपये पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांक रक्कम तीन हजार रुपये व तृतीय क्रमांक रक्कम दोन हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने सावंतवाडीचो लाडको इकोफ्रेन्डली बाप्पा या स्पर्धेचे आयोजन सन 2023 रोजी करण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धेमध्ये खालील नागरिकांनी व विद्याथ्यार्नी यश प्राप्त केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव चित्रकला स्पर्धा 2023 प्रथम क्रमांक आयुष दत्ताराम पाटणकर, मदर क्वीनस स्कूल, हर्षिता संदीप देऊलकर मिलाग्रीस स्कूल (द्वितीय), जयराम जयेश राऊळ (तृतीय), कळसुलकर इंग्लिश स्कूल यांनी यश संपादन केले आहे. याचे परीक्षण मोरजकर यांनी केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2023- प्रथम क्रमांक सतीश रामचंद्र सुभेदार- भटवाडी, सिद्धेश श्रीपतराव सुर्वे- खासकीलवाडा (द्वितीय), सतीश बाळकृष्ण सावंत- सबनिसवाडा (तृतीय), महेंद्र बाबाजी चव्हाण-सबनिसवाडा (उत्तेजनार्थ), सुनिल सुरेश नेवगी- जूना बाजार उत्तेजनार्थ. पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट रील स्पर्धा 2023- प्रथम क्रमांक अमेय अनिल महाजन, सालईवाडा तानिया अनिल भिसे- उभा बाजार (द्वितीय), अंकीता मोतिराम नेवगी-वैश्यवाडा (तृतीय), चिरायू प्रवीण टोपले-शिरोडा नाका (उत्तेजनार्थ), समीर गणेश लाड - चितार आळी (उत्तेजनार्थ) वरील स्पर्धकानी सावंतवाडीचो लाडको इकोफ्रेन्डली बाप्पा 2023 अंतर्गत यश प्राप्त केले असून सावंतवाडीचो लाडको इकोफ्रेन्डली बाप्पा 2024 या स्पर्धेचे बक्षीस वितरणाच्या वेळी यांचा गौरव करण्यात येणार आहे. तरी नागरिकानी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणासाठी नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.