
मुंबई : आभा परिवर्तनवादी संस्थेच्या माध्यमातून मागील ५ वर्षांपासून अवयवदान जागृतीचे काम अविरतपणे चालू आहे. सध्या देह मुक्ती मिशन, वसई आणि दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे. नुकतेच दादर, मुंबई येथे युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रुग्ण कल्याण सेवा सामाजिक संस्था, भंडारी मंडळ, दादर सतकर्म फाउंडेशन, मालवणचो कट्टो प्रतिष्ठान, विजय क्रीडा मंडळ, भांडुप (प) ऋतेश चॅरिटेबल ट्रस्ट, जोगेश्वर यांच्या माध्यमातून ब्लड डोनेशनच्या कॅम्पच्या आयोजन केलं होत.
आभाच्या माध्यमातून याठिकाणी अवयवदान नोंदणी आणि जागृतीचे काम करण्यात आले. आभाच्या संकल्प अवयवदानाचा उपक्रमाचे प्रमुख सुमित वाडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आभाचे संस्थापक अध्यक्ष राजेश मोरे, मार्गदर्शक पोलीस निरीक्षक नालंदा मॅडम, ममता सरवणकर मॅडम, सचिव रुपेश सावंत, कार्यकारणी सदस्य शशांक भुवड, कार्यकर्ता अमित सिँह उपस्थित होते.
या कार्यक्रमात एकूण ४० जणांनी नोंदणी करून अवयव दानाचा संकल्प केला. आभा संस्थेला हि संधी दिल्या बद्दल युनिक ब्लड मोटिव्हेटर्सचे संस्थापक अध्यक्ष जय साटेलकर, उपाध्यक्ष अमोल सावंत आणि दि फेडरेशन ऑफ ऑर्गन डोनेशन संस्थचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांचे आभार मानण्यात आले. अवयवदान जागृतीच्या कार्यक्रमासाठी (7506010771) या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलय.










