खाडीपात्रातील गाळ उपसासाठी निधीची तरतूद करण्याचे आदेश

मंत्री केसरकरांनी केली होती मागणी
Edited by: दिपेश परब
Published on: June 24, 2024 10:17 AM
views 211  views

वेंगुर्ला : राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेट निधी जुलै सन २०२४-२५ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा, आरोंदा, तेरेखोल ते बांदा खाडीपात्रातील गाळ उपसा करणे या कामाचा समावेश करून त्यास निधीची तरतूद करण्याबाबतची मागणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बंदर विकास मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली होती. याबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून सदर गाळ उपसा करण्याच्या कामासाठी निधीची तरतूद करण्याबाबतच्या कामाला बंदर विकास मंत्री संजय बनसोडे यांनी मंजुरीचे आदेश दिले आहेत. 

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा, आरोंदा, तेरेखोल ते बांदा ही खाडी असून सदर खाडीचे खाडीपात्र हे विस्तीर्ण आहे. तसेच खाडीपात्र हे पूर्णतः गाळाने भरलेले आहे, त्यामुळे या भागातील मच्छीमारी व पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. तरी सदर खाडीपात्रातील गाळ काढल्यास या भागातील मच्छीमारी व पर्यटन व्यवसायाला जालना मिळणार असून खाडीपात्रात प्रचंड प्रमाणात निर्माण झालेल्या गाळामुळे भेडसावणाऱ्या समस्या दूर होणार आहेत. तरी या खाडीपात्रातील गाळ काढणे या कामाबाबत आपल्या विभागाकडून सर्वे करून या कामासाठी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बंदर विकास मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली होती. यानुसार या कामाला बंदर विकास मंत्री संजय बनसोडे यांनी मंजुरीचे आदेश दिले आहे.