
सावंतवाडी : कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव यांच्यावतीने माध्यमिक व प्राथमिक शाळेतील मुलांसाठी स्व.डॉ.सौ. मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा दोन गटात शनिवार दि. १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता वाचन मंदिरात होणार आहे. तरी आपल्या प्रशालेतील मुलांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धा सावंतवाडी, दोडमार्ग, कुडाळ, वेगुर्ला तालुक्यातील शाळांमधील मुलांसाठी आहे.
स्पर्धेचे विषय :
गट-५ वी ते ७ वी विषय- मातृदेवोभव , शिवराय आज असते तर... व पुस्तकांच्या सहवासात मी, असे असून यापैकी कोणत्याही एका विषयावर ४ ते ५ मिनिटे बोलावे असे म्हटले आहे. तर गट - ८ वी ते १० वी
विषय- रतन टाटा - यशाचे दुसरे नाव..., सेंद्रिय शेती गरज व महत्त्व व वाचन संस्कृतीचे बदलते रूप आणि आजचा वाचक असे असून यापैकी कोणत्याही एका विषयावर ५ ते ६ मिनिटे बोलावे असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.